Home क्राईम धक्कादायक : हलखेडा शिवारातील जंगलात माजी सैनिकाचा खून

धक्कादायक : हलखेडा शिवारातील जंगलात माजी सैनिकाचा खून


मुक्ताईनगर प्रतिनिधी । वडोदा ते हलखेडा दरम्यानच्या जंगलात पैश्याच्या वादातून माजी सैनिकाचा खून करून १ लाख ६ हजाराची रोकड लांबविल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अनोळखी सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रल्हाद शिवमराम पाटील (वय-५२) रा. सावर्डे ता. कागल जि. कोल्हापूर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, प्रल्हाद पाटील हे गावातील मित्र अनिल आनंदा निकम यांच्यासोबत कारने शेगांव दर्शनासाठी ५ नोव्हेंबर रोजी निघाले होते. दरम्यान प्रल्हाद पाटील हे माजी सैनिक असल्यामुळे त्यांच्या परिचयाने व्यक्ती हलखेडा येथे राहत असल्याने त्यांना भेटून पुढे शेगाव दर्शनाला जाण्याचा बेत होता. रात्री ९ वाजता प्रल्हाद पाटील यांनी एका मित्राला फोन करून बोलाविले. त्यावेळी एकजण त्यांना घेण्यासाठी दुचाकी घेवून आला. दुचाकीवर प्रल्हाद पाटील आणि अनिल निकम हे बसून मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा गावाजवळील तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वढोदा ते हलखेडा जंगलात गेले. त्याठिकाणी आगोदर ६ साथीदार जण उपस्थित होते. यावेळी प्रल्हाद पाटील आणि पवार आडनाव असलेल्या तरूणांचा पैश्यांवरून बाचाबाची झाली. यात प्रल्हाद पाटील यांनी पुतण्या यांच्या फोन पे वरून ५५ हजार रूपये दिले. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेले काही रक्कम असे एकुण १ लाख ६ हजार ५०० रूपये दिले. पुन्हा पैश्यांच्या वादावरून हाणामारी झाली. दोघांना जखमी करून अनोळखी ६ ते ७ जण घटनास्थळाहून पसार झाले. जखमी झालेले प्रल्हाद पाटील यांना उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. अनिल निकम यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सहा ते सात जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ करीत आहे.


Protected Content

Play sound