चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मैत्रीचा गैरफायदा घेत आणि लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यात उघडकीस आली आहे. या अत्याचारातून पीडित मुलीने एका बालकाला जन्म दिला असून याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय पीडित मुलीची ओळख दीड वर्षापूर्वी दीपक प्रकाश भिल याच्याशी झाली होती. सुरुवातीला मैत्रीचे नाते असताना आरोपीने मुलीला “तू माझ्यासोबत राहशील का?” असे विचारत लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर, आरोपीने पीडितेवर भवाळे शिवारातील लवण (नाल्या) मध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

पीडितेच्या अल्पवयीन असण्याचा फायदा घेत आरोपीने वारंवार तिचे शारीरिक शोषण केले. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. जेव्हा तिने ही बाब आरोपी दीपकला सांगितली, तेव्हा त्याने तिला दाद न दिली नाही. दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी पीडित मुलीने एका बालकाला जन्म दिल्याचे समोर आले.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून चोपडा ग्रामीण पोलिसांनी आरोपी दीपक प्रकाश भिल याच्या विरुद्ध संशयित आरोपी दीपक भिल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



