Home क्राईम धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार


जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संशयित आरोपी राहुल रमेश राठोड (वय २५, रा. पिप्राळा) याने २९ जानेवारी रोजी पीडितेला फुस लावून सुरत येथे नेले. तेथे त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपीने तिला सुरत येथे आपल्या बहिणीच्या घरी नेले होते. तेथे आरोपीने तिला धमकी दिली की, जर तिने या घटनेबाबत कोणालाही सांगितले तर तो तिला जिवंत सोडणार नाही. घाबरलेल्या पीडितेने जळगावला परतल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


Protected Content

Play sound