अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या कुटुंबाला जातिवाचक आणि अश्लिल शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दुखापत केली. तर कुटुंबातील माय आणि लेकीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता घडली होती. या संदर्भात चौकशी अखेर सोमवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता मारवड पोलीस ठाण्यात दोन जणांवर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात ३८ वर्षीय महिला ह्या आपल्या दिव्यांग पती आणि दिव्यांग असलेले मुलगा व मुलगी यांच्या सोबत वास्तव्याला आहेत. त्यांच्या घरासमोर राहणारा दीपक सुरेश पाटील हा नेहमी त्यांच्या अपंग मुलीला अश्लिल हातवारे करून इशारा करत असतो. १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिला ह्या आपले पती आणि दोघी मुलांसोबत घरी असताना घरासमोर राहणारा दीपक पाटील आणि त्याची आई सुरेखा सुरेश पाटील हे दोघेजण घरासमोर येऊन कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दीपक पाटील याने महिलेच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात जातीवाचक शिवीगाळ केली केली. पतीला मारहाण करत असल्याचे पाहून महिला आणि त्याचे दोन्ही दिव्यांग मुलगा आणि मुलगी हे देखील आवरणासाठी आले. त्यावेळी दिपक पाटील आणि सुरेखा पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर महिलेसह त्यांची मुलीचा विनयभंग केला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर गावातील उपस्थित नागरिकांनी महिलेच्या पतीची आणि त्यांच्या मुलांची सुटका केली. दरम्यान या प्रकरणी महिलेने सोमवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे दीपक सुरेश पाटील आणि त्याची आई सुरेखा सुरेश पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप हे करीत आहे.