पारोळा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील बहादरपूर शिरसोदे येथे रविवार २३ जून रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास झालेल्या पावसात शिरसोदे येथे मखनापूर पाझर तलाव परिसरामध्ये विज पडल्यामुळे १५ मेंढ्या व एक बकरी दगावली असून मेंढपाळला सुद्धा विजेच्या धक्का बसल्यामुळे दुखापत झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले.
मेंढ्यांच्या सांभाळ करून उदरनिर्वाह करणाऱ्या दामू भिल या मेंढपाळावर नैसर्गिक संकट कोसळले आहे. याप्रसंगी पोलीस पाटील बंडू पाटील कोतवाल भरत पवार तसेच तलाठी प्रवीण शिंदे आप्पा यांनी पंचनामा केला. प्रसंगी ग्रामसेवक योगिता पाटील शिरसोदे सरपंच बापू सैंदाणे तसेच ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
प्रसंगी मंत्री अनिल भाईदास पाटील यांना दूरध्वनी द्वारे माहिती देऊन नुकसानग्रस्त मेंढपाळासाठी नुकसानीची मागणी केले असून संबंधित नुकसानग्रस्त मेंढपाळच्या संदर्भात मान्य पालकमंत्री यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधत पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.