पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथील आईस फॅक्टरीत मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने अमोनिया वायूमुळे येथील ख्वाजा नगर परिसरातील अनेक नागरीकांच्या डोळ्यात अमोनिया वायू गेल्या डोळ्यांनी इजा होवून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनेकांना जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काहीजण पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहूर येथील आईस फॅक्टरीत अचानक स्फोट झाल्याची घटना मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. याच वेळी मुस्लिम समाजातील मयत झालेल्या महिलेला कब्रस्थान मध्ये ठेवून परतत असतांना या स्फोटमुळे वाकोद रस्त्यावरून जाणाऱ्यांना डोळ्यात अमोनिया गॅस गेल्याने आपला जीव मुठीत घेवून सैरावैर पळत सुटले. पहूर गावात मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाल्याने यात सरपंच अफजल तडवी, शाकीनाबी सलीम खान पठाण्या यांच्यासह सात जणांची प्रकृती खराब झाल्याने त्यांनी पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तर काही जणांवर पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा स्फोट कश्यामुळे झाला याची माहिती अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.