चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त केलेल्या ट्रॅक्टरवर चक्क गांज्याची रोपे उगलेली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून ही झाडे चर्चेचा विषय झाली आहेत.
या संदर्भात अधिक असे की, येथील तहसील कार्यालयाच्या आवारात काही गौण खनिजाची ट्रॅक्टर जप्त करण्यात आली आहेत. हे ट्रॅक्टर अनेक दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या आवारात उभे आहेत. मात्र सध्या या ट्रॅक्टरमधील गौण खनिजातून गांज्याची रोपे उगलेली दिसून येत आहेत. चाळीसगाव तहसील कार्यालयाच्या आवारात तालुका भरातून विविध कामांसाठी येणारे नागरिक विद्यार्थी-विद्यार्थिनी कुतूहलाने या झाडांकडे पाहतात. तर गांज्याची रोपे नेमके या भागात गांजाचे बी आले कुठून? आणि या ट्रॅक्टरवर गांजाची रोपे कशी? हा चर्चेचा विषय होत आहे.