सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यात मोठी धक्कादायक घटना घडली. सावदा येथील एका गावात अल्पवयीन मुलीस तिच्या ओळखीच्या तीन मुलांनी ओळखीचा फायदा घेत फूस लावून आळीपाळीने शारिरीक अत्याचार केला. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार व विनयभंग केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलिस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, पोलिस उपनिरिक्षक अमोल गर्जे यांनी पोलिस पथकाच्या साहाय्याने गतीमान हालचाली करून अवघ्या तीन तासाच्या आत २ संशयित आरोपींना व एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. त्यांच्यावर सिआर नं.१७३/२०२४, कलम ७०(२)७५(१)(१),३,(५) व बाल लैंगिक संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४,८,१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपास करून संशयित अल्पवयीन आरोपीला बालन्यायालय व इतर दोन संशयित आरोपींना सत्र न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.