धक्कादायक ! दोन अल्पवयीन बहिणींवर सामूहिक अत्याचार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील परगाव कारखाना येथील एका गावात दोन अल्पवयीन मावस बहीणींवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मुलींचा व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल देखील केले आहे. या प्रकरणी मुलींच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यावर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवधूत राजू पंचरास, कुणाल कैलास बोऱ्हाडे, महेश तांबे व दोन अल्पवयीन मुले अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकुण ५ जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content