Home क्राईम धक्कादायक : खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला शस्त्रांसह बेड्या ; दोन पिस्तुल आणि...

धक्कादायक : खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला शस्त्रांसह बेड्या ; दोन पिस्तुल आणि ८ तलवारी जप्त!


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरात गुन्हेगारी कारवायांना लगाम घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या एका सराईत आरोपीला त्याच्या साथीदारासह जिल्हापेठ पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून १५ हजार रुपये किमतीची मोटार सायकल, ६० हजार रुपये किमतीची दोन गावठी पिस्तुल आणि ४० हजार रुपये किमतीच्या ८ तलवारी, असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी धनंजय उर्फ धिरज दत्तू कोळी (वय २०, रा. पाळधी) हा जळगाव शहरात फिरत असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तात्काळ एक पथक तयार करून आर.आर. शाळेच्या परिसरातील गल्लीत पेट्रोलिंग दरम्यान सापळा रचण्यात आला.


Protected Content

Play sound