
धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका खाजगी कंपनीत महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रहिवाशी असलेल्या ३५ वर्षीय पीडित महिला धरणगाव परिसरातील एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये पीडितेची मुलगी आजारी असल्याने, तिला रजेबाबत विचारण्यासाठी पीडिता कंपनीच्या केबिनमध्ये गेली होती. यावेळी संशयित आरोपी अधिकारी जनार्दन नामक व्यकतीने पिडीत महिलेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. “तू मला खुश कर, मी तुला सुट्ट्या देईन आणि पगारही कापणार नाही,” असे म्हणून आरोपीने पीडितेचा विनयभंग केला.
पीडितेने या कृत्याचा प्रतिकार केला असता, आरोपीने तिला कानशिलात लगावून जमिनीवर पाडले आणि अश्लील चाळे केले. इतकेच नव्हे तर, “माझे ओळखीचे गुंड आणि राजकारणी आहेत, जर तू कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,” अशी धमकीही दिली. आरोपीने या घटनेचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून पीडितेला गप्प करण्याचा प्रयत्न केला.
अखेर पीडितेने हिंमत एकवटून धरणगाव पोलीस गाठले आणि तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाख्पल कण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण तांदळे करत आहेत.



