जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरातील एका भागात राहणाऱ्या ८ वर्षीय चिमुकलीसोबत जवळच्या नातेवाईकाने अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की. जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील एका भागात ८ वर्षीय चिमुकली ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी २० सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चिमुकलीच्या मावशीच्या पतीने तिला जवळ ओढून तिच्या सोबत अश्लिल चाळे केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहे.