धक्कादायक पुण्यातील एनडीए परिसरात सापडला बॉम्ब

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील एनडीए परिसरात बाँब सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कमळजाई मंदिर परिसरात पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना एक बॉम्ब आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी बॉम्ब नाशक पथकाने एनडीएच्या जंगलात स्फोटकाच्या साहाय्याने त्यांचा स्फोट घडवून बॉम्ब नष्ट केला.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, उत्तमनगर हद्दीत एनडीए रस्त्यावरील कमळजाई या मंदिराजवळच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. खोदकामादरम्यान मजुरांन बॉम्बसदृश्य वस्तू आढळली असता मजूरांनी घाबरून याबाबत ठेकेदाराला कळवले. त्यानंतर ठेकेदाराने तत्काळ पोलिसांना बोलावले.

त्यानंतर उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच बॉम्ब शोधक पथकाला बोलावले असता त्यात अतिशय कमी शक्तीचा आणि जुना असलेला बाँम्ब सापडला. हा बॉम्ब निर्मनुष्य भाग असलेल्या एनडीएच्या जंगलात नेऊन स्फोटकांच्या साहाय्याने त्याचा स्फोट करून नष्ट करण्यात आला. शेजारीच एनडीएची हद्द आहे, त्यांच्या सरावादरम्यान खूप वर्षांपूर्वी हा बॉम्ब तिथे पडलेला असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Protected Content