Home क्राईम धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेत महिलेवर अत्याचार

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेत महिलेवर अत्याचार


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी २७ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात २७ वर्षीय महिला ही कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान गावातील संशयित आरोपी मुकेश राहूल जाधव (वय-२५) याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिला पालघर येथील भोईसर येथे १७ मे रोजी पळवून नेले. तेथे नेवून तिच्यावर लग्नाचे आमिष दाखविले आणि तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार २८ मे पर्यंत सुरूच होता. त्यानंतर महिला ही आपल्या गावी आले. मंगळवारी ८ जून रोजी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी मुकेश राहूल जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.


Protected Content

Play sound