Home क्राईम धक्कादायक : पब्जी खेळण्याच्या नादात तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

धक्कादायक : पब्जी खेळण्याच्या नादात तरूणीची गळफास घेवून आत्महत्या


जामनेर प्रतिनिधी । शहरातील दत्त मंदीर परिसरातील दारवाडा येथे राहणारी व बारावीत शिकणाऱ्या १९ वर्षीय तरूणीने पब्जी खेळत असतांना राहत्या घरात पंख्याला दोरीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली. याबाबत जामनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, नम्रता पद्माकर पाटील (वय-१९) रा. दत्त मंदिर शेजारी जहागीर दार वाडा जामनेर ही आपल्या कुटुंबियांसह सोबत जैन डॉक्टर यांच्या घरात राहतात. आज १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी वडील पद्माकर पाटील हे बाहेर केले तर आई सांयकाळी वाकी रोडला घराच्या कामावर पाणी मारण्याचा कामानिमित्त गेल्या होत्या. यावेळी नम्रता ही पब्जी गेम खेळत असताना एका लेव्हल पर्यंत आली. व त्यावेळी तिने घरातील पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. सोबत आत्महत्या करण्यापुर्वी तीने  सुसाईड नोट लिहून दिली असून “मी माझ्या मर्जीने आत्महत्या करीत असून यामध्ये माझ्या घरच्यांच्या कोणाचाही दोष नसल्याचा उल्लेख केला आहे. नम्रता पाटील ही नेहमी मोबाईल मध्ये असायची अशी माहिती घरच्यांकडून मिळाली. घटनेमुळे जामनेर शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल करीत आहे.


Protected Content

Play sound