मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली. जुन्या वादातून एका १७ वर्षीय मुलाची भररस्त्यात तलवारीने हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात मृत तरुण एक आरोपी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अल्पवयीन मुलावर तलवारीने हल्ला करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या अधारे पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमद पठाण असे मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारी अहमद यांच्यावर एका वर्दळीच्या रस्त्यावर हल्ला करण्यात आला. आरोपीसह तीन ते चार जण तलवारी, काठ्या घेऊन आले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. अहमदने मदतीसाठी आरडाओरडा केला. परंतु, हल्लेखोर एकामागून एक प्रहार करत असताना रस्त्यावरील कोणत्याही व्यक्तीने हस्तक्षेप करण्याची हिंमत दाखवली नाही. या घटनेत पीडित आणि हल्लेखोर एकमेकांना ओळखत होते आणि १५ दिवसांपूर्वी एका मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. हा हल्ला नियोजित होता आणि सविस्तर नियोजन करून आरोपींनी हा हल्ला केला.