Home क्राईम धक्कादायक : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार

धक्कादायक : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार

0
104

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आयोध्या नगरात परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. राहुल योगराज पाटील वय-२६, रा. आयोध्या नगर, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, अयोध्या नगर परिसरातील एका भागात २२ वर्षीय तरुणीही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान १ जानेवारी २०२४ रोजी तरुणी आंघोळ करत असताना संशयित आरोपी राहुल पाटील याने नकळत तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर त्याने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. दरम्यान, हा अत्याचार असेही झाल्याने तिने अखेर एमआयडीसी पोलिसातून तक्रार दिली. त्यानुसार संशय आरोपी राहूल पाटील याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे.


Protected Content

Play sound