हैदराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एका अभिनेत्याने तिच्या प्रेयसीचे कार अपघातात निधन झाल्यामुळे त्यांने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार तेलंगणा राज्यातील अलकापूर येथे घडला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री पवित्रा जयाराम हिचा कार अपघातामध्ये मृत्यू झाला. यानंतर सर्वजण धक्क्यात असतानाच अभिनेता चंद्रकांतने आत्महत्या केली आहे. पवित्रा जयाराम आणि चंद्रकांत हे दोघे एकाच तेलुगु मालिकेत काम करत होते.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी चंद्रकांतने तेलंगणातील अलकापूर येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पवित्रा जयाराम आणि चंद्रकांत हे दोघे एकमेकांना डेट करत होते. यांची भेट मालिकेच्या सेटवरची झाली होती. पवित्रा हिच्या निधनानंतर चंद्रकांतला अत्यंत मोठा धक्का बसल्याचे सांगितले जातंय.चंद्रकांत हा गेल्या काही दिवसांपासून खूप जास्त अस्वस्थ होता. पवित्रा हिच्या निधनानंतर त्याला धक्का बसला होता. हेच नाही तर पवित्राच्या निधनानंतर त्याने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट देखील शेअर केली होती. हेच नाही तर त्याची पवित्रा विषयीचीच शेवटची पोस्ट देखील आहे. 12 मे रोजी हैद्राबाद येथे पवित्राच्या कारचा अपघात झाला. बसची धडक कारला बसली आणि या अपघातामध्ये पवित्राचा जीव गेला. यावेळी कारमध्ये बहीण अपेक्षा, चालक श्रीकांत हे देखील होते. बेंगलुरू ट्रिपवरून आल्यावर ते नवीन नात्याला सुरूवात करणार होते. मात्र, पवित्राचा अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले, असा खुलासा चंद्रकांतच्या वडिलांनी केला आहे.