मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात बैठकांची फेरी सुरू आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. ज्ञानेश्वर कटकेयांनी उद्धव ठाकरे गट शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी ज्ञानेश्वर कटके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
मुंबईत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर कटके यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ज्ञानेश्वर कटके यांनी शिरूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक समन्वयक, पुणे बांधकाम विभागाचे सदस्य आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. ज्ञानेश्वर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.