Home क्राईम तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

0
213

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव शिवारातील शेतात तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह चुंचाळे रस्त्यावरील खुशाल चौधरी यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. महमूद हुसेन पटेल (वय ४०, रा. दहिगाव) असे मृताचे नाव आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक धारवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे, राजेंद्र पवार, विजय चौधरी आणि पुरुषोत्तम पाटील हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. मृताचा मृतदेह यावल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होऊ शकेल.


Protected Content

Play sound