Home क्राईम केटी वेअर येथे तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

केटी वेअर येथे तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ !


चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील नारोद गावात एका तेवीस वर्षीय तरूणाचा गुळ नदीत मयत स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहन पानाचंद पाटील वय २३ रा. नारोद ता. चोपडा असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील नारोद गावात रोहन पाटील हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. दरम्यान शनिवारी २१ मार्च रोजी गुळ नदीवरील केटी वेअर येथे रोहन याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याला तातडीने चोपडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मयत घोषीत केले. याबाबत अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी चंदूलाल सोनवणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound