Home क्राईम नदीपात्रात प्रौढाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; कारण अस्पष्ट !

नदीपात्रात प्रौढाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; कारण अस्पष्ट !


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील भोकर नदीपात्रात एका प्रौढाचा मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कैलास बचनसिंग गोड (वय ४५ रा. निंभोरा सिम ता. रावेर) असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील निंभोर सिम गावात कैलास बचनसिंग गोड हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. दरम्यान गुरूवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तालुक्यातील भोकर नदी पात्रात त्यांचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली. निंभोरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला, त्यानंतर परिसरातील नागरीकांनी मयताची ओळख पटविली. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound