शेंदुर्णी, ता.जामनेर प्रतिनिधी | येथील राणी लक्ष्मीबाई महिला सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा, शेंदुर्णी जीनप्रेसच्या संचालिका, शेंदुर्णी दक्षिण भाग विकासोच्या माजी संचालिका शोभाबाई उत्तमराव थोरात (६५) यांचे २४ रोजी सायं. ५.१५ वा. अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार, २५ रोजी सकाळी १० वा. परकोट गल्ली येथील राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, पाच मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्या सहकार महर्षी, भाजपाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव थोरात यांच्या पत्नी, तर शेंदुर्णी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निलेश थोरात, राहुल थोरात यांच्या मातोश्री होत.