मुक्ताईनगर येथे खड्डा दुरुस्तीसाठी शिवसेनेचे ‘गांधीगिरी आंदोलन’ (व्हिडीओ)

085cf16d 1dc7 450b b484 bdc3c6d1d71e

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील प्रवर्तन चौकात ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे पाईपलाईन लिकेज दुरुस्त करताना खोदलेला खड्डा तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्यात येवून जेसीबीने माती ढकलण्यात आली होती. ही माती काही अवजड वाहनांमुळे दाबली गेली असून अनेक अवजड व प्रवासी वाहने यात फसण्याचे प्रकार घडत आहेत. हा खड्डा केव्हाही एखाद्या जीवघेणा अपघाताला आमंत्रण देऊ शकतो, यासाठी शिवसेनेने आज येथे बेशर्मीचे झाड लावून गांधीगिरी आंदोलन केले. तसे आठ दिवसात हा खड्डा न भरल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 

सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभाग तसेच नगर पंचायत प्रशासन यांना निवेदन व सूचना देऊनही दीड महिन्यावर कालावधी उलटला असून संबंधित विभाग टोलवा-टोलवी करीत आहेत. शिवसेनेतर्फे आंदोलनस्थळी पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता यांना पुष्पहार घालून बेशर्मिचे एक झाड भेट देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई, अॅड. मनोहर खैरनार, गोपाळ सोनवणे, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान, उपतालुका प्रमुख बाळा भालशंकर, राजेंद्र तळेले, शहर प्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, माजी सरपंच रामभाऊ पुनासे, जाफर अली, सलीम खान, जहीर शेख, शकुर जमदार, तालुका संघटक प्रवीण चौधरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शहर संघटक वसंत भलभले, नगरसेवक संतोष मराठे, युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे, युवासेना तालुका प्रमुख पंकज राणे, संतोष माळी, दीपक खुळे, आकाश सापधरे, चेतन पाटील, किरण कोळी , स्वप्नील श्रीखंडे, अमोल भोई, शुभम तळेले, योगेश पाटील, राजू पाटील, वढवा आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. हे आंदोलन सुरू असताना कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गाडीतून उतरून आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी शिवसेनेने नागरी समस्येकरिता केलेल्या या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले.

 

 

Add Comment

Protected Content