जळगाव, प्रतिनिधी । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० कुटुंबांना आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वाटप महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
महापौर जयश्री सुनील महाजन यांनी यावेळी सांगितले की, राज्य व केंद्राकडून नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी संघटनेची गरज असते, तेच काम शिवसेनेचे संघटन अतिशय उत्कृष्ट प्रकारे करत आहे. शिवसैनिक विराज कावडीया यांनी या योजनेचा लाभ देण्यासाठी नावनोंदणी मोहीम राबवली व ५०० लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड तयार केले आहेत. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे उत्कृष्ट संघटन कार्यरत आहे. या कार्याच्या जोरावर शहरात विधानसभा व लोकसभेला शिवसेनेचा उमेदवार नक्की निवडून येईल अशी ग्वाही महापौर जयश्री सुनील महाजन यांनी दिली. शिवसैनिक विराज कावडीया यांच्या नेतृत्वात मे महिन्यात, शिवसेना जळगाव महानगरतर्फे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनविण्याचे शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरात ५०० आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड बनविण्यात आले आहेत. याचे वाटप याप्रसंगी माजी महापौर नितीन लड्ढा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, संघटक दिनेश जगताप, विराज कावडीया उपस्थित होते. आज प्रातिनिधिक स्वरुपात ५० कार्डांचे वाटप करण्यात आले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/215817680384795