डॉ.पायल तडवीप्रकरणी कारवाईची शिवसेना आदिवासी सेलची मागणी

2fb83522 89b6 4f9c b772 f7239f748cbf

यावल (प्रतिनिधी) मुंबई येथील नायर हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आदिवासी डॉ.पायल तडवी यांच्या मृत्युस कारणीभुत असलेल्या तिघा तरूणींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी शिवसेना आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष हुसैन जहांगीर तडवी यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

 

येथील निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांना दिलेल्या आपल्या निवेदनात शिवसेना आदीवासी सेलच्या पदाधिकारी यांनी म्हटले आहे की, या प्रकरणातील गुन्हेगार असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे, आणी डॉ. अंकिता खंडेलवाल यांचे राजिस्ट्रेशन रद्द करावे व तसेच या डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणात चौकशीच विलंब करणाऱ्या नायर हॉस्पीटलमधील जबाबदार अधिकाऱ्यांनाही निलंबीत करावे. डॉ.पायल तडवीच्या कुटुंबास तत्काळ आर्थीक मदत द्यावी आणि सदरचा हा खटला स्पेशल न्यायलयात जलद गतीने चालवुन गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी.

शिक्षण क्षेत्रात आदीवासींवर होत असणाऱ्या रॅगींगचा प्रतिबंध करण्यासाठी स्वतंत्र रोहीत वेमुला कायदा त्वरीत अमलात आणावा. सदरच्या मागण्या मान्य न झाल्यास यावल तालुका शिवसेना, युवा शिवसेना आणी शिवसेना आदिवासी सेलच्या माध्यमातुन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. या निवेदनावर हुसैन जहांगीर तडवी, नगरसेवक दिपक रामचंद्र बेहडे, जगदीश कवडीवाले, योगेश पाटील, अजहर खाटीक, सागर बोरसे, भुषण नगरे, जितेन्द्र सरोदे, शेख अजहर, निलेश पाराशर, धिरज पाटील, शेख रईस, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Add Comment

Protected Content