जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत नाभिक समाज मंडळ जळगाव शहर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन जळगाव पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री.नारायण पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच कोल्हापूर येथे झालेल्या पंचवार्षिक सभेतील नवनियुक्त जळगाव जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सचिव, तसेच इतर शहर कार्यकारणी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला, त्यानंतर समाजातील एक गरीब विद्यार्थिनी लावण्या शिवाजी अहिरे हिला ट्रॉफी व रुपये ५,०००/- रोख रक्कम देण्यात आली.
कार्यक्रमास जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री.कांतलालजी वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष श्री.जगन्नाथजी वखरे, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.देवीदासजी ठाकरे, जळगाव शहर अध्यक्ष रमेश शिंदे जळगाव शहर उपाध्यक्ष मनोज बिढे, जळगाव शहर कार्याध्यक्ष विलास साळुंखे जळगाव जळगाव शहर सचिव गणेश शिंदे, जळगाव शहर सहसचिव प्रेम डापसे, शहर कार्यकर्ते अनिल सूर्यवंशी, एकनाथ बोढरे, सुधाकर सोनवणे, लहू राऊत, मयूर सोनवणे, भारत अहीराणे, राजू अहिरे तसेच शहरातील इतर सदस्य उपस्थित होते.