Home Cities जळगाव शिवराज पाटील यांची शिवसेना सोशल मीडिया जळगाव जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती 

शिवराज पाटील यांची शिवसेना सोशल मीडिया जळगाव जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक विस्तारात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शिवसेना सोशल मीडिया जळगाव जिल्हा प्रमुखपदी शिवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील सोशल मीडिया कार्याला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पक्षाच्या सर्वोच्च नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवराज पाटील यांच्या निवडीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनल, उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख मयूर मगर पाटील यांची सहमती लाभली. या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नवीन जबाबदारीबद्दल भावना व्यक्त करताना शिवराज पाटील यांनी सांगितले की, “शिवसेना पक्षाच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे करणार आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि प्रत्येक कार्यात सदैव कटिबद्ध राहीन.” त्यांच्या या वक्तव्यानंतर पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेच्या सोशल मीडिया विंगचा कार्यक्षेत्र आजच्या डिजिटल युगात अत्यंत महत्त्वाचा घटक ठरत असून, युवकांशी थेट संपर्क साधण्यासाठी हा माध्यमप्रवाह प्रभावी ठरत आहे. शिवराज पाटील यांची कार्यशैली आणि संघटन कौशल्य पाहता, जिल्ह्यातील सोशल मीडिया कार्य अधिक गतिमान होईल आणि युवकांचा पक्षाशी अधिक दृढ संबंध निर्माण होईल, असा विश्वास पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound