मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा श्वास आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यकारभार करणे हा आमचा ध्यास आहे. म्हणूनच महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपतींचे शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारणार आहोत. इतकेच नव्हे तर शक्य झाल्यास सूरत येथेही महाराजांचे मंदिर उभारु, असे घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते कोल्हापूर येथून शिवसेना आणि महाविकासआघाडीचे उमेदवार के पी पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांनी विद्यमान राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत म्हटले की, हे सरकार केवळ अदानींचा विकास करण्यासाठी काम करत आहे. महाराष्ट्र लूटत आहे, ओरबडत आहे आणि अदानी आणि गुजरातच्या घषात घालत आहे. मी आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने जाहीर करतो की, मराठी माणसाने लढून मिळवलेली मुंबई आम्ही अदानींच्या घशात घालू देणार नाही. हे सरकार पूर्ण भ्रष्ट आहे. यांनी छत्रपती शिवाजी महाराज याचा पुतळा उभारतानाही भ्रष्टाचार केला. या निवडणूक ही जनता या भ्रष्ट सरकारला माफ करणार नाही. मशालीच्या धगीमध्ये हे सरकार जळून खाक होईल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.