जळगाव प्रतिनिधी । रेल्वे प्रशासनाने सलग तीन दिवस दीड-दीड तासांचे तीन ब्लाॅक घेवून शिवाजीनगर उड्डानपुलाच्या लोखंडी पुलाचे स्टीलवर्कचे गडर कटींग करण्याचे काम शनिवारी पुर्ण करण्यात आले होते. सागांडा उचलण्यासाठी मागविलेल्या दोन क्रेन पुलावर उभ्या करण्यात आल्या आहेत.
उद्या मंगळवारी उड्डानपुलाचा लोखंडी पुलाचा सांगाडा हटवण्यात येणार आहे. रेल्वेच्या चार ट्रॅकवर असलेला १९ मीटर लांबीचा लाेखंडी सागांडा हटवण्याचे काम मंगळवारी होणार आहे. ओव्हर हेड इलेक्ट्रीक या २५ हजार व्हॅट क्षमतेच्या वीज वाहिनीवर अवघ्या १० ते १५ फूट अंतरावर या पुलाचे गडर आहेत. ते आता अर्धवट कापण्यात आले आहे. उद्या मंगळवारी मेगा ब्लाॅक घेऊन ते उचलण्यात येतील. त्यासाठी वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.