श्रीक्षेत्र राहेरा येथे शिवदिक्षा सोहळा व गुरुवर्यांचे आशीर्वचन

पहूर ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्रीक्षेत्र राहेरा तालुका जामनेर येथे आज श्री गुरु नागलिंग स्वामी यांच्या पुण्यतिथी सोहळा निमित्त शिवदीक्षा सोहळा व गुरुवर्य यांचे आशीर्वाचन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीक्षेत्र राहिला तालुका जामनेर येथे श्री गुरु नागलिंग स्वामी यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शिव दीक्षा संस्कार( गुरु मंत्र) व सत्संग सोहळा श्री ष.ब्र. 108 वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने श्री ष.ब्र.108 सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा, जिल्हा बुलढाणा यांचे आशीर्वाचन होणार आहे.

शिव दीक्षा संस्कार व आशीर्वाचनाचा कार्यक्रम आज रविवार रोजी सकाळी नऊ वाजेपासून सुरू होणार आहे तर महाप्रसादाचा कार्यक्रम दुपारी एक वाजेनंतर होणार आहे. तरी जामनेर तालुक्यासह पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन वीरशैव लिंगायत समाज राहेरा तालुका जामनेर व शिवा संघटना जिल्हा जळगाव व बुलढाणा यांनी केले आहे.

Protected Content