जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त शिवजन्मोत्सव देखावा सादर करून जागर करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुख पाहुणे अतुल मनोहर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा.दीपक झांबरे, प्रा. हेमंत इंगळे, प्रा. ईश्वर जाधव यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात ढोलताशांच्या गजरात शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सवाचा देखावा सादर करण्यात आला. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गड किल्ल्यांचे संगोपन याविषयावर पथनाट्य सादर केले. शिवरायांचा जयजयकार आणि पोवाड्यांनी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परिसर शिवशाहीमय झाला होता.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील यांनी शिवजयंती उत्कृष्टपणे साजरी केल्याबद्दल कौतुक केले. कार्यक्रमांमध्ये ढोल, ताशे, लेझिम व वक्तृत्व सादर करणार्या विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले. वक्तृत्व विजेता मयुरी भोइ, र्तेजस सूर्यवंशी, लेझीम प्रकार विजेते- गणेश कोलते, मेघा सोनवणे, ढोल प्रकार विजेते- मयूर कोळी, सिद्धी खंदारे, ताशा प्रकार- तुषार पाटील यांना पारितोषिक देण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रांजल कापुरे व प्रांजल राजपुत या विद्यार्थिनीनी केले. शिवजयंती कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सचिन महेश्री, नीलेश चौधरी, सुरज चौधरी, चंद्रकांत शिंपी यांच्यासह प्राध्यापकांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.