Home Cities भुसावळ शिव वाहतूक सेनेच्या तालुकाध्यक्षपदी हेमंत खंबायत यांची निवड

शिव वाहतूक सेनेच्या तालुकाध्यक्षपदी हेमंत खंबायत यांची निवड

0
33


khanbayat nival

भुसावळ प्रतिनिधी । शिव वाहतूक सेनेच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी हेमंत खंबायत यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ॲड. श्याम श्रीगोंदकर यांनी नियुक्त दिले आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने व राज्याचे अध्यक्ष दिपक माहेरवरी यांच्या आदेशाने शिव वाहतूक सेनेच्या तालुकाध्यक्षपदी हेमंत खंबायत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती येत्या सहा महिन्याकरीता असून त्यांच्या पदाचा कार्य अहवाल बघूनच पुढील मुदतवाढी संदर्भात निर्णय घेतला जाणर आहे. आज वाहतुकदारांना खंबीर नेतृत्वाची गरज असुन त्यांची विश्वासहर्ता जपणे ही अत्यंत महत्त्वपर्ण वाव आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवतेने सर्व सामान्य वाहतूकदार व जनतेला अभिप्रेत असणारी वाहतूक सेना उभारली पाहीजे. असे आवाहन नियुक्तीपत्रात केले आहे.


Protected Content

Play sound