चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील सनपुले येथील रहिवासी व शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ.लताबाई चंद्रकांत सोनवणे यांनी आज (दि.३) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता, याप्रसंगी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विष्णू भंगाळे, घनश्याम अग्रवाल, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, मुन्ना पाटील, यावलच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी, माजी महापौर राखी सोनवणे, पंचायत समितीचे उपसभापती एम.व्ही. पाटील, डॉ. महेंद्र पाटील, जि.प. सदस्य हरीश पाटील, माजी सभापती बळीराम सोनवणे, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, संपर्क प्रमुख सुधीर गडकरी, ए.के. गंभीर, तालुका युवा सेनेचे अध्यक्ष गोपाल चौधरी, शहर प्रमुख आबा देशमुख, तुषार पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र बिटवा, राजू जैस्वाल, प्रकाश राजपूत ,संध्या माळी, विकास पाटील, अॅड.एस.डी. सोनवणे, दीपक चौधरी, मनीषा जैस्वाल, राजाराम पाटील, सुनील पाटील, भैय्या पवार, नरेश महाजन, मिनाबाई शिरसाठ, भरत बाविस्कर, दीपक जोहरी, माजी नगरसेवक शामकांत सोनवणे आदी उपस्थित होते.