Home Cities भडगाव भडगावात शिवसेना शहर महिला आघाडीचा मेळावा

भडगावात शिवसेना शहर महिला आघाडीचा मेळावा


Bhadgon shivsena

भडगाव (प्रतिनिधी)। शिवसेनेचा महीला आघाडीचा मेळावा आज येथे उत्साहात पार पडला. मेळाव्यात जिल्हा संपर्कप्रमुख रचनाताई पाटील, जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, भडगाव तालुका प्रमुख सीमाताई पाटील, पाचोरा तालुका प्रमुख मंदाताई पाटील, भडगाव शहरप्रमुख पुष्पाताई परदेशी, पाचोरा शहरप्रमुख किरणताई पाटील आदींनी मेळाव्यात मार्गदर्शन केले.

यानंतर मेळाव्यात महीला आघाडीच्या पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. यात भडगाव‌ उपशहरप्रमुखपदी कमलताई अहीरे, सुशिलाताई पाटील, रजंनाताई पाटील‌ व पाचोरा उपशहरप्रमुखपदी मालती पाटील व प्रियंका पाटील यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रंसचालन मनोहर चौधरी यांनी केले. तर कार्यक्रम‌ यशस्वीतेसाठी जे.के. पाटील, लखीचंद पाटील, रविंद्र पाटील, दिलीप राजपूत, माधव राजपूत, नरेद्र सुर्यवंशी आदी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound