शिवसेना स्वबळावर विधानसभा लढणार ; दिवाकर रावतेंच्या वक्तव्याने खळबळ

307195 302718 divakarravte1

 

सांगली (वृत्तसंस्था) एकीकडे युतीची चर्चा सुरु असतांना दुसरीकडे मात्र, शिवसेना स्बळावर लढणार आणि सगळे उमेदवार निवडून आणणार, असं वक्तव्य करून शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली आहे. सागंलीमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

 

शिवसेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून आम्ही यावेळी आमचे सामर्थ्य दाखवून देऊ आणि सगळे उमेदवार निवडून आणू असा विश्वास दिवाकर रावते यांनी बोलून दाखवला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार अशी चर्चा एकीकडे सुरू असताना शिवसेनेला जर 144 जागा मिळाल्या नाही तर युती होणार नाही, असेही दिवाकर रावते यांनी म्हटले आहे.

Protected Content