रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तालुका बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्षाचे उपनेते गुलाबरावजी वाघ यांनी उपस्थित राहून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात वाघ म्हणाले की, “आगामी निवडणुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढवणार असून कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून पक्षाचा झेंडा प्रत्येक प्रभागात फडकवावा.”

बैठकीस शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगीराज पाटील, शिवसेना उपजिल्हा संघटक रवींद्र पवार सर, नितीन महाजन, तालुकाप्रमुख अशोक शिंदे, तालुका संघटक सुधाकर बापू महाजन, भावलाल पैलवान, सुरेश शिंदे, राजू लोहार, राकेश घोरपडे, शहरप्रमुख संतोष प्लंबर, भरत नेते, सावदा शहरप्रमुख मिलिंद पाटील, वसीम मेंबर, लतीफ शेख, निलेश महाजन, गोपाल मिस्तरी, अविनाश पाटील, मुकेश पाटील, प्रवीण पाटील, देवानंद गजरे, संतोष महाजन, संजू सुवरले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.



