अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र राज्य संघटनक पदी ॲड. ललिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आले आहे. लोकसभेत केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांची नियुक्ती करण्यात आले आहे.
ॲड. ललिता पाटील यांनी गेल्या लोकसभेच्या निवडणूकीसह शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात यशस्वी कामगिरी केले आहे. तसेच अमळनेर तालुक्यात मेळाव्याची एकच चर्चा असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक पदी नियुक्ती करण्यात आले आहे. या थोड्याच अल्पावधीत त्यांच्या निवडीने अंमळनेर तालुका व शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाब वाघ, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, डॉ हर्षल माने, महानंदा पाटील, युवासेना सचिव विराज कवाडिया, जिल्हा युवासेना प्रमुख निलेश चौधरी यांनी अभिनंदन केले. अमळनेर शहरातील शिवसेना पदाधिकारी व अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.