शिवसेना-उबाठाचे ठरले : चाळीसगावातून उन्मेष पाटलांना उमेदवारी !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाचोऱ्याच्या पाठोपाठ चाळीसगावसाठी आपला उमेदवार निश्चीत केला आहे.

अद्यापही शिवसेना-उबाठा पक्षाची उमेदवारांची यादी समोर आलेली नाही. तथापि, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांना उमेदवारी निश्चीत झाल्याची माहिती समोर आली असून या संदर्भात टिव्ही नाईन या वाहिनीने वृत्त दिले आहे.

शिवसेना-उबाठा पक्षाने या आधीच पाचोरा मतदारसंघातून वैशालीताई सुर्यवंशी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या पाठोपाठ उन्मेषदादा पाटील यांची उमेदवारी निश्चीत झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना मातोश्रीवरून एबी फॉर्म देण्यात आला असून त्यांच्या उमेदवारीबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या मतदारसंघातून आधीच मंगेश चव्हाण यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. परिणामी आता येथून मंगेश चव्हाण विरूध्द उन्मेष पाटील असा जंगी मुकाबला रंगणार आहे.

Protected Content