यावल प्रतिनिधी । वादग्रस्त ठरलेली सिने अभीनेत्री कंगणा राणावत हीने महाराष्ट्र व मुंबई पोलीसांबाबात केलेल्या संतापजनक वक्तव्याचा शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करीत कंगणावर कडक कारवाई करण्या बाबतचे निवेदन येथील तहसीलदारांना शिवसेना व युवा सेनाच्या माध्यमातुन देण्यात आले आहे.
या संदर्भात दिलेल्पा निवेदनात शिवसेनेने म्हटले आहे की, मुंबई येथील हिंदी सिने अभीनेत्री कंगना राणावत हिने महाराष्ट्र पोलीसांवर व मुबर्इं पोलीसांवर कंगना हीने अविश्श्वास दर्शवित त्यांचेबद्यल अनुद्गावर काढले या मुळे संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे कंगणा हिचेवर कडक कारवाई करण्यात यावी व ती न झाल्यास शिवसेना व युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला.
या निवेदनावर व शिवसेना जिल्हा उपप्रमुख तथा कृउबा समितीचे सभापती मुन्ना पाटील, शिवसेना शहरप्रमुख जगदिश कवडीवाले, युवासेना शहर उपप्रमुख सागर देवांग, नगरसेवक दिपक रामचंद्र बेहेडे, पप्पु जोशी, आदीवासी सेनेचे तालुकाप्रमुख हुसैन तडवी, आर. के. चौधरी, यावल शहर सेना महीला आघाडीच्या संघटक सपना घाडगे, संतोष बंडु वाघ, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख, पिंटु कुंभार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल बारी, सचिन कोळी, सागर बोरसे यांच्या स्वाक्षरी आहेत.