Home Cities यावल यावलला उद्या शिवसेना पक्षाची तालुका बैठक

यावलला उद्या शिवसेना पक्षाची तालुका बैठक

0
76

यावल प्रतिनिधी । शहरात उद्या (दि.२ नोव्हेंबर) रोजी दुपारी २ वाजता तालुका शिवसेनेची महत्वाची बैठक आयोजीत करण्यात आली आहे.

दरम्यान यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजीत या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख मार्गदर्शक म्हणुन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगरचे आमदार चंदकांत पाटील हे राहणार असुन, या बैठकीस यावल तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांनी प्रामुख्याने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, शिवसेनेचे यावल तालुकाप्रमुख रवीन्द्र सोनवणे, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, फैजपुर शहरप्रमुख अमोल निकाळे, यावलच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा शरद कोळी तथा प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ यांनी केले आहे.

 


Protected Content

Play sound