यावल येथे सराफा दुकानास शिवसेना संपर्क प्रमुख विलास पारकर यांची भेट

यावल प्रतिनिधी । यावल येथे शिवसेनेचे शहराध्यक्ष कवडीवाले यांच्या सराफा दुकानावरील शस्त्र दरोडाप्रकरणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी भेट देवून कुटुंबियांना धीर दिला आहे.

येथील सराफा व्यवसायीक तथा शिवसेनेचे शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले यांच्या सराफा दुकानावर दोन दिवसापुर्वी पडलेल्या शस्त्र दरोड्याच्या पार्श्वभुमीवर पक्षातील विविध पदाधिकारी, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या दुकानास भेट देवुन त्यांच्या कुटुंबास धीर दिला. दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख विलास पारकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान पाटील यांनी जगदीश कवडीवाले यांच्या सराफा दुकानास भेट दिली.

यावेळी कवडीवाले यांच्या कुटुंबाशी उपस्थित मान्यवरांनी घडलेल्या घटने विषयी सविस्तर माहीती जाणुन घेतली व त्यांना धिर दिला. या भेटीत शिवसेनेचे तालुका प्रमुख रवीन्द्र सोनवणे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शरद कोळी, युवा सेनेचे तालुका सरचिटणीस सचिन कोळी, तालुका उपसंघटक पप्पु जोशी, युवा सेनेचे उपशहर प्रमुख पिंटु कुंभार, युवा सेनेचे शहर समन्वयक सागर बोरसे, युवा सेना सरचिणीस विजय पंडीत, शिवसेना विभाग प्रमुख योगेश राजपुत, सारंग बेहेडे, राजु श्रावगी, मयुर धोबी, भरत चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Protected Content