शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

 

मुंबई प्रतिनिधी । शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: फेसबुकवर पोस्ट टाकत याबाबतची माहिती दिली. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

“लोक संकटात असताना नेतृत्वाने घरात बसून चालत नाही. कोविडचे सर्व नियम पाळूनदेखील लोकहिताची कामे करताना अखेर कोविडने मला गाठलेच. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात मी उपचार घेणार असून ईश्वरकृपेने आणि लोकाशिर्वादाने लवकरच यातून बाहेर पडेल. आपल्या सदिच्छा आणि आशिर्वाद हेच माझे बळ आहे.”

राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे 22 हजार 543 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाख 60 हजार 308 इतकी झाली आहे.

 

Protected Content