
धरणगाव (प्रतिनिधी) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेरमनपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेकडून सुभाष सखाराम महाजन यांचा आज सत्कार करण्यात आला.
आज सकाळी धरणी चौकातील महात्मा फुले पुतळ्याजवळ सुभाष महाजन यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उद्योगपती व माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, गटनेते पप्पू भावे, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार निलेश चौधरी, नगरसेवक भागवत चौधरी, युवासेना शहर प्रमुख संतोष महाजन, महेंद्र चौधरी, किशोर चौधरी, अफजल पठाण, किरण अग्निहोत्री यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.