नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट झाली. त्या भेटीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमची चर्चा झाली आहे. लवकरच आमचे सरकार येणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
राऊत यांनी माहिती दिली की, यावेळी १०० टक्के शिवसेनेचेच सरकार येईल. पुढच्या आठवड्यात शिवसेनेचं सरकार स्थापन होणार आहे. आज संध्याकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीनंतर पुन्हा एकदाशरद पवार यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी ४.३० वाजता काँग्रेसच्या हंगामी अधक्षा सोनिया गाधी या प्रदेश नेत्यांना भेटणार आहेत. तर साडेपाच वाजता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.