यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संतोष देशमुख यांची अमानुषरित्या हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडातील सर्व आरोपींना भर चौकात जाहीररित्या फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करीत शिवसेना ( शिंदे गट ) च्या रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांच्या वतीने करण्यात येवुन यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटवर आरोपी वाल्मीक कराडच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील मस्साजोग जिल्हा बिड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृणपणे करण्यात आलेल्या हत्येस तिन महिने झाले असुन,या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्येचे घटने मधील आरोपींची समाज मनाला सुन्न करणारी अशी विकृत मानसिकता दर्शविणारे फोटो समोर आले असून , सदरच्या हत्याकांडाचा खटला जलदगतीच्या न्यायलयात चालवुन या क्रूर हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी मागणी करण्यात आली आहे.
या जोडे मारो आंदोलनात शिवसेना रावेर लोकसभा क्षेत्राचे जळगाव जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे यावल तालुका प्रमुख राजु काठोके, यावल तालुका उपप्रमुख रामभाऊ सोनवणे,यावल तालुका संघटक गोलु पाटील, यावल शहर उपप्रमुख राजु सपकाळे ,सागर कोळी, यावल तालुका महिला प्रमुख पुजा पाटील, सीमाताई धनगर , संदीप भास्कर भोई, किशोर कपले यांच्यासह शिवसेनिक या आंदोलनात सहभागी झाले होते .