महावितरणच्या विरोधात शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांचे आमरण उपोषण सुरु

0691fe2b 77e8 4b6d 8ba4 225b0b38255c

पाचोरा (प्रतिनिधी) शहरात गेल्या दोन महिन्यांपुर्वी वीज वितरण कंपनीने वीजचोरी, वीज मिटरमध्ये बिघाड आणि अनियंत्रित रिडींगची वाढ यासारखे कारणे दाखवून चांगली मिटर बदलवली. पण तेव्हपासूनच ग्राहकांना दुप्पट व तिप्पट किमतीचे बिल येत आहेत. या समस्येच्या विरोधात शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी सोमवारपासून तहसिल कार्यालय पाचोरा समोर आमरण उपोषनाला सुरूवात केली आहे.

 

वीज मिटर बसवुन महिना उलटत नाही. तोवर ग्राहकांना दुप्पट व तिप्पट किमतीचे बिले हातात सोपवण्यात आली आहेत. या अतिरेक वाढीव बिलांनी ग्राहकांना आर्थिक भुदंड तर बसलाचं. पण ग्राहकांनी या विषयी तक्रारी केल्यानंतर सर्व प्रकरणांची चौकशी न करता याउलट ग्राहकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली. संबंधित अधिकारींकडे गेले असता. त्यांनी देखील बिले भरावीचं लागतील, असे उत्तरं देऊन आपले हात झटकले.

 

एकीकडे दुष्काळी परीस्थितीत सापडलेले वीज ग्राहक हे हवालदिल आहेत. दुसरीकडे मात्र वीज कंपन्या अधिकचे बिलं आकारणी करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या सर्व तक्रारींची दखल विज पुरवणारे महावितरण कंपनीने व वीज अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि वाढीव बिले त्वरीत कमी करून नवीन मिटरांची चौकशी करून दुरूस्ती करावेत. तसेच आहेत त्या स्थितीतील जुने मिटर सध्या तसेच ठेवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे पाचोरा शहर शिवसेना यांनी केली होती. पण ग्राहकांच्या तक्रारीकडे विद्युत महामंडळाने दुर्लक्ष केल्याने आमरण उपोषणाला किशोर बारवकर यांनी तहसिल कार्यालय पाचोरा समोर उपोषनाला सुरूवात केली आहे.

 

उपोषनस्थळी आ.किशोरआप्पा पाटील व तहसिलदार कैलास चावडे, विद्युत महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांनी भेट घेतली. तसेच उपोषनकर्ते किशोर बारवकर यांच्यांशी चर्चा केली. आशिर्वाद इन्फ्राचे मुकुंदजी बिल्दीकर, अॅड.दिनकररावजी देवरे, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे,नगरसेवक सतिष चेडे, आनंद पगारे, बापु हटकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, युवा जिल्हा समन्वयक पप्पु राजपुत, तालुकाप्रमुख शरद पाटील, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी अजयकुमार जैस्वाल, तालुकायुवाधिकारी सौरभ चेडे, शहरयुवाधिकारी संदिप पाटील, अनिकेत सुर्यवंशी, बबलु धनवडे, महेश पाटील, जितेंद्र पेंढारकर, वैभव राजपुत, मयुर महाजन, योगेश पाथरवट ,शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी मंदाताई पाटील, उर्मिला शेळके, सुनंदाताई महाजन,बे बाताई पाटील,सुषमा पाटील,चंदा ठाकरे, स्मिता बारवकर, लता चौधरी, वैशाली पाटील, ज्योती पाटील, चेतना पाटील, सुवर्णा पाटील, रत्ना देसले, पुनम पाटील, कल्पना सुर्यवंशी, प्रतिभा खैरनार, उर्मिला भागवत, प्रतिभा सोनार, राजश्री सोनवणे, प्रसन्ना देवरे, रंजना आमले, शोभा वाघ, प्रतिभा मिस्तरी, कल्पना पाटील, मिनाक्षी मोरे, लक्ष्माबाई मिस्तरी, सुनंदा पाटील, ज्योती सोनवणे, जया सुरवाडकर, प्रिती सोनवणे, गिता मोरे, सिंधुताई पाटील, प्रमिला परदेशी, मनिषा पाटील, वंदना सोनवणे, सुनिता सिनकर, डाॅ.भरत पाटील, अविनाश कुडे, गणेश देशमुख, डाॅ.नंदकिशोर पिंगळे, डाॅ.दिपक चौधरी, डाॅ.राहुल झेरवाल, डाॅ.जी एस महाजन, अनिल पाटील, डाॅ.देशमुख, डाॅ.शर्मा, राजेन्द्र ठाकरे, कैलास पाटील हे उपस्थित होते. तसेच दिवसभर विविध संघटनांचा आणि विद्युत महामंडळापासुन त्रस्त ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद सुरू होता.

 

ज्या ग्राहकांची वाढीव बिलासंबंधित व मीटरांबद्दल तक्रारी आहेत. त्यांनी कार्यकारी अभियंता पाचोरा यांच्या नावाचा आपला लेखी तक्रार अर्ज ( आपले नाव पत्ता फोन नंबर व तक्रारीचे स्वरूप लिहुन ) आणि नवीन किंवा मागच्या महिन्याच्या बिलाची झिराॅक्स प्रत तक्रार अर्जा सोबत जोडुन उपोषणस्थळी शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांच्याकडे सुपुर्द करावे. तसेच उपोषनाला आपला पाठींबा दर्शवावा, असे जाहिर आवाहान पाचोरा शिवसेना व युवासेनावतीने करण्यात आले आहे.

Protected Content