शिवसैनिकांनी गुंडगिरी करू नये : रामदास आठवले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू असलेली गुंडगिरी चुकीची असून यापुढे रिपाइंचे कार्यकर्ते हे शिंदे यांच्यासोबत असतील अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

रामदास आठवले यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या सोबत दोन तृतीयांश सदस्य असल्याने त्यांना स्वतंत्र गट म्हणून सहजपणे मान्यता मिळणार आहे. उध्दव ठाकरे त्यांना पक्षातून निलंबीत करू शकतात. मात्र त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक झाले असून यावर देखील रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, गुंडागिरी असून याला याच भाषेत उत्तर दिले जाऊ शकते. मात्र हा प्रकार साफ चुकीचा असून या प्रकरणी रिपाइंचे कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे असल्याचेही त्यांनी सांगितले. तर शिवसेनेत सध्या जे काही सुरू आहे ते या पक्षाचा अंतर्गत मामला असून यात देवेंद्र फडणवीस अथवा भाजप यांचा काहीही रोल नसल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

 

Protected Content