मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील शिवसेना (शिंदे गटाचे) शेकडो युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
यामध्ये दिपक चिंचोले(बाळा भाऊ) , निलेश भारसाके,सलमान पिंजारी,अरमान पिंजारी, समीर पिंजारी, दर्शन ठाकुर,शुभम ठाकुर, रोशन झांबरे,योगेश माळी, रुपेश कवळे,योगेश जुमळे, मयुर हळपे,आशिष राजपुत, मयुर चव्हाण,मजीद शाह, ओम जुमळे,धिरज जुमळे,संतोष कवळे, स्वप्निल आवारे, ईशान बोराखडे,नारायण फिरके, संतोष धनगर,रहेमान पिंजारी,भावेश बागवान, विलास मराठे,कैलास मराठे,महेंद्र सपकाळे,अमोल सपकाळे,योगेश जुमळे, लोकेश पाटिल, ओम माळी यांच्यासह शेकडो युवकांनी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी रोहिणी ताई खडसे यांनी या युवकांच्या गळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना रोहिणीताई खडसे म्हणाल्या शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा शेतकर्यांच्या कष्टकर्यांच्या हितासाठी व नव तरूणांसह शोषित घटकांना न्याय देण्यासाठी कटीबध्द आहे. राष्ट्रवादी कॉंगेस शरदचंद्र पवार पक्ष हा सर्व समावेशक सर्व जाती धर्माला घेऊन विकासाच्या वाटेवर चालणारा पक्ष आहे कितीही वादळे संकटे आले तरी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची अखंड वाटचाल सुरु आहे तुम्हा सर्वांचे मी पक्षात स्वागत करते सर्वांना पक्षात योग्य सन्मान दिला जाईल.
पुढे बोलतांना रोहिणीताई म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला मुक्ताईनगर विधानसभेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे. त्यासाठी पक्षाला आपले कुटुंब मानुन सर्वांनी एकजुटीने पक्ष विस्तारासाठी मेहनत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे, कार्य सर्वसामान्यां पर्यंत पोहचवा असे रोहिणी खडसे यांनी आवाहन केले.
यावेळी यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष बबलू सापधरे, प्रदिप साळुंखे, बापु ससाणे, संजय कोळी, संदीप जुमळे, राहुल पाटिल, चेतन राजपुत, जितेंद्र पाटिल, निलेश भालेराव,विजय शिरोळे, अजय अढायके,राहुल बोदडे,रोहन महाजन उपस्थित होते.