अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर शहरात यंदाही सालाबादप्रमाणे सार्वजनिक शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाणार आहे. या वर्षीच्या शिवजयंती मिरवणुकीत विविध पारंपारिक कलापथकांचा समावेश असणार असून, या उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यासाठी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता अमळनेर नगरपरिषद हायस्कूलच्या मैदानातून मिरवणुकीला प्रारंभ होईल. या मिरवणुकीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार असून, शाळकरी विद्यार्थ्यांचे पथनाट्य, लाठ्या-काठ्यांचे कर्तब, महिला लेझीम पथक, भजनी मंडळ आणि वाढी संस्थांचा दिमाखदार सहभाग असणार आहे. शिवभक्तांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. हजारोंच्या संख्येने नागरिक या मिरवणुकीत सहभागी होणार असून, त्यासाठी विविध ठिकाणी सेवाभावी उपक्रम राबविले जातील. मिरवणुकीच्या मार्गावर विविध सेवाभावी कार्यकर्त्यांकडून नागरिकांसाठी अल्पोपहार व थंड पेयांचे वाटप करण्यात येणार आहे
विजय मारुती मंदिर: भावेश जैन यांच्या वतीने लाडू वाटप
पाच पावली मंदिर: राज लाड यांच्या वतीने अल्पोपहार
बस स्टँड: निलेश फार्मा तर्फे लस्सी वाटप
महाराणा प्रताप चौक: योगेंद्र बाविस्कर व तुषार बाविस्कर यांच्या वतीने थंड पेय वाटप
मिरवणुकीदरम्यान: तुषार सोनार व शुभम पाटील यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे वाटप
नाट्यमंदिर: आकाश परदेशी यांच्या वतीने थंड पेय वाटप
शिवजयंती मिरवणुकीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे दुपारी १२ वाजता होईल. या वेळी अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांच्या परिवारातर्फे शिवभक्तांसाठी शिवभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, मिरवणुकीत सहभागी कलापथकांचा सन्मान चिन्ह आणि वह्या भेट देऊन गौरव करण्यात येईल. या उपक्रमासाठी मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून अमळनेरच्या युवा मित्र परिवारातर्फे १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत नाट्यगृह परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी रक्तदात्यांना टी-शर्ट आणि ट्रॉफी भेट देण्यात येणार आहे. या उपक्रमाला सुप्रसिद्ध बिल्डर सरजूसेठ गोकलानी, मुंदडा बिल्डर्सचे अमेय मुंदडा, आदित्य बिल्डर्सचे प्रशांत निकम, ॲड. दिनेश पाटील, कृ. उ. बा. संचालक सचिन पाटील आणि भिकेश पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. या भव्य शिवजयंती उत्सवात अधिकाधिक शिवभक्तांनी सहभागी होऊन शिवरायांचा जयघोष दुमदुमवावा आणि हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.